पत्रकार गोपाल तुपकर यांच्या कुटुंबीयांवर हल्ला करणाऱ्या व धमकवणाऱ्यांना तडीपार करा; चिखली तालुका पत्रकार संघाची मागणी

 
Nznnz
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दैनिक पुण्यनगरीचे प्रतिनिधी पत्रकार गोपाल तुपकर यांचे पुतणे शुभम तुपकर यांच्यावर हल्ला करून त्यांच्याकडून रोख रक्कम पळवणाऱ्या व तक्रार मागे घेण्यास साठी घेण्याचा दबाव आणून धमकी देणाऱ्यांवर तडीपारची कारवाई करावी अशी मागणी चिखली तालुका पत्रकार संघाच्या वतीने ठाणेदार संग्रामसिंह पाटील यांना करण्यात आली आहे दि. २७ नोव्हेंबर रोजी या मागणीचे निवेदन पत्रकार संघातर्फे ठाणेदार पाटील यांना देण्यात आले. 
पत्रकार गोपाल तुपकर यांचे पुतणे शुभम तुपकर यांना चार-पाच दिवसांपूर्वी मेकर फाट्यावरून चिखलीकडे येताना रात्रीच्या प्रसंगी रस्त्यात अडवून मारहाण करण्यात आले व त्यांच्याकडील रोख रक्कम पळवल्या गेली या घटनेतील आरोपींवर ठाणेदार संग्राम से पाटील यांनी तातडीची कारवाई करून त्यांना अटक केली. ठाणेदार पाटील यांच्या या वेगवान तपास कार्याबद्दल पत्रकार संघाने समाधान व्यक्त केले आहे. परंतु त्यांच्या या कठोर कारवाईमुळे या समाजकंटकांचे पित्त खवळले व त्यांनी पोलीस कारवाईची बातमी इंस्टाग्राम वर टाकल्यामुळे गोपाल तुपकर यांचे दुसरे पुतणे गौरव तुपकर याला धमकावून सदर बातमी डिलीट करण्यास व तक्रार मागे घेण्यास घेण्यात सांगितले. तसे न केल्यास त्याला मारहाण करण्याची धमकी देखील दिली.
             चिखली शहरात वाढत असलेल्या या गुंडशाही प्रवृत्तीला ठाणेदार संग्रामसिंह पाटील हे जरब बसवत आहेत, ही नागरिकांच्या दृष्टीने दिलासादायक बाब आहे, याच पार्श्वभूमीवर तुपकर कुटुंबाला सतत धमक्या देणाऱ्या व कायद्याचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या सदर समाजकंटकांवर आपण कठोर कायदेशीर कारवाई करून गुन्हेगारी प्रवृत्ती असणाऱ्या या गावगुंडाचा तडीपारीचा प्रस्ताव तयार करावा आणि पत्रकारांच्या कुटुंबांना आणि सर्वसामान्य नागरिकांना देखील सुरक्षा देण्याबाबत आश्वासित करावे अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनावर चिखली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश शर्मा उपाध्यक्ष कमलाकर खेडेकर सचिव तौफिक अहमद यांच्यासह संतोष लोखंडे, कैलास शर्मा, रेणुकादास मुळे, कैलास गाडेकर, इप्तेखार खान, रवींद्र फोलाने, नितीन फुलझाडे, छोटू कांबळे, इमरान शहा, साबीर शेख, साहिल शेख, भारत जोगदंडे, राजू सुरडकर आदी सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.