साखरखेर्डा येथे डेंग्यू तापाचा आणखी एक बळी..! ग्रामपंचायत ठोस पावले उचलणार केव्हा?
Aug 26, 2024, 10:09 IST
साखरखेर्डा(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या साखरखेर्डा येथे डेंग्यू तापाने थैमान घातले आहे. २१ ऑगस्ट रोजी प्रियंका नरवाडे नामक तरुणाचा डेंग्यू तापाने मृत्यू झाला होता. आता त्या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच आणखी एक बळी डेंग्यू तापाने गेला आहे. साखरखेर्डा येथील अशोक कामाजी देवकर (३४) यांचा डेंग्यू तापाने मृत्यू झाला आहे. वाढता डासांचा प्रादुर्भाव पाहता ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.