परीक्षेच्या बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण पेठच्या अंकुश तायडेला भोगावी लागणार कर्माची फळे!

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सण २०१८ साली बारावी परीक्षेच्या बंदोबस्तात कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली होती. प्रकरण न्यायप्रविष्ट होते. त्यावर अंतिम निकाल लागला असून चिखली तालुक्यातील पेठच्या अंकुश तायडेला १०,५०० रुपयांच्या दंडासह एका वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. एस.बी. डिगे यांनी आज २१ फेब्रुवारी रोजी सुनावली.
  Ut
                  Add 👆
घटना २६ फेब्रुवारी २०१८ साली घडली होती. चिखली तालुक्यातील पेठ येथील ज्ञानेश्वर विद्यालयाच्या गेटजवळ सचिन जगन्नाथ ठेंग हे (होमगार्ड) बंदोबस्तासाठी तैनात होते. त्यावेळी त्याठिकाणी अंकुश अर्जुन तायडे (रा. पेठ) याने त्यांच्याशी वाद घातला, शिवीगाळ करून मारहाण ही केली. त्यामुळे त्याच्याविरुद्ध अमडापूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाअंती दोषारोप पत्र बुलढाणा येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. जिल्हा न्यायाधीश -२ यांच्या न्यायालयात खटला चालला. सदर प्रकरणात फिर्यादी पक्षातर्फे एकूण आठ साक्षीदारांची साक्षी पुरावे नोंदविण्यात आले. त्यामध्ये फिर्यादी सचिन जगन्नाथ ठेंग, प्रत्यक्षदर्शी पोकॉ राहुल अशोक जाधव, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र अमडापूर व तपास अधिकारी एपीआय विक्रांत पृथ्वीराज पाटील यांची साक्ष नोंदविण्यात आली. या साक्षीदारांच्या साक्ष घटनेला पूरक व विश्वासार्य ठरल्या. तसेच सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. सोनाली सावजी देशपांडे यांनी प्रभावीपणे सरकारी पक्षाची बाजू मांडली. त्याआधारे वि. जिल्हा न्यायाधीश-२ श्री. एस. बी. डिगे यांनी आरोपी अंकुश तायडे याला एका वर्षाच्या सश्रम कारावासाची सुनावणी केली. तसेच १०,५०० इतका दंड खोटावला असून दंडन भरल्यास प्रत्येकी एक महिना ससरम कारावास अशा प्रकारची शिक्षा सुनावली आहे. सदर प्रकरणात फिर्यादी पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. सोनाली सावजी देशपांडे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. तर पोहेकॉ ताठे,पोहेकॉ कमलाकर देशमुख, पोहेकॉ शांताराम जाधव यांनी कोर्ट पैरवी म्हणून सहकार्य केले.