'ज्ञानगंगा' अभयारण्यात आज होणार प्राणी गणना!दहा मचान उभारले; पर्यटकांच्या सुविधेची अशी घेणार काळजी

 
jfjdjf

 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : वनक्षेत्रात वन्यजीवप्रेमींना निसर्गाचा आनंद घेता यावा यासाठी दरवर्षी बौद्ध पौर्णिमेच्या लखलखत्या चंद्र प्रकाशात मचानावर बसून वन्यप्राण्यांची गणना केली जात आहे. त्या अनुषंगाने आज, ५ मे च्या रात्री बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात १० मचानीवर बसून पर्यटकांसह निसर्गप्रेमींना प्राणी गणनेचा आनंद घेता येणार आहे.

  अस्वलांसाठी ज्ञानगंगा अभयारण्य प्रसिद्ध आहे. अजिंठा पर्वत रांगेवरील या जंगलात अस्वलांसाठी पोषक वातावरण असल्याने मोठ्या प्रमाणात अस्वलांचा येथे अधिवास आहे. या जंगलातून ज्ञानगंगा नदी उगम पावते. त्यामुळे या अभयारण्यास ज्ञानगंगा अभयारण्य असे नामकरण करण्यात   आले आहे. बुलडाणा, चिखली, मोताळा आणि खामगाव या चार तालुक्यांत ज्ञानगंगा अभयारण्य २० हजार हेक्टर क्षेत्रफळावर विस्तारलेले आहे. यंदा ढगाळ वातावरणामुळे  समस्या निर्माण झाली आहे.

  पर्यटकांच्या सुविधेची अशी  काळजी

बौद्ध पौर्णिमेच्या रात्री पाऊस आला तर पर्यटकांना तथा निसर्गप्रेमींना कोणताही त्रास होऊ नये म्हणून त्यांना प्रसंगी वेळेत जंगलातून बाहेर काढण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. प्रसंगी ढगाळ वातावरणाचाही फटका या गणनेस बसण्याची शक्यता आहे. दुसरीकडे तीन मचान या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. वन्यजीव विभाग प्राणी गणनेसाठी सज्ज आहे.