बुलडाण्यात आज आपल्या अनिल म्हस्के पाटलांचा सन्मान सोहळा! समस्त बुलडाणेकर आणि पत्रकार बांधवांचे आयोजन; व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळेही सन्मान सोहळ्यासाठी बुलडाण्यात..!

 
Anil mske
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पत्रकारांची देशभरातील सर्वात मोठी संघटना असलेल्या व्हॉईस ऑफ मिडियाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के पाटील यांचा आज,५ जूनला बुलडाण्यात नागरी सत्कार होणार आहे. समस्त बुलडाणेकर आणि पत्रकार बांधवांच्या वतीने या नागरी सन्मान सोहळ्याचे आयोजन केले आहे.  बुलडाणा अर्बनच्या मुख्यालयासमोरील गोवर्धन ईमारतीत सायंकाळी ६ वाजता या सोहळ्याला सुरुवात होणार आहे. अनिल म्हस्के पाटलांना प्रदेशाध्यक्ष या नात्याने राज्यपातळीवर नेतृत्व करण्याची संधी मिळणे म्हणजे समस्त बुलडाणेकरांसाठी गौरवाची बाब आहे, त्यामुळेच हा सन्मान सोहळा योजिला आहे. विशेष म्हणजे व्हॉईस ऑफ मिडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी बुलडाण्यात दाखल झाले आहेत.
 

या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी बुलडाणा अर्बनचे संस्थापक भाईजी चांडक राहणार असून प्रमुख उपस्थितीत प्रसिद्ध लेखक तथा जेष्ठ संपादक चंद्रकांत वानखेडे उपस्थित राहणार आहेत. खासदार प्रतापराव जाधव, आमदार धिरज लिंगाडे, आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे, आमदार श्वेताताई महाले, आमदार संजय गायकवाड, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत हे कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. आपल्या माणसाचा सन्मान होता असताना "याची देही याची डोळा" पाहण्यासाठी आणि सन्मान करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बुलडाणेकर नागरिक व पत्रकार बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.