"बुलडाणा लाइव्ह" च्या अनिल मंजुळकरांना सत्यस्पर्शी पत्रकारिता पुरस्कार! मेहकर तालुका ग्रामीण पत्रकार संघ व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेने केला गौरव; एएसपी बी.बी. महामुनींच्या हस्ते झाला सन्मान

 
dfghjkl
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्ह्यात अल्पावधीत वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या बुलडाणा लाइव्ह ने डिजिटल मीडिया च्या क्षेत्रात क्रांती घडवली आहे. बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक वाचकसंख्या असलेल्या "बुलडाणा लाइव्ह" चे मेहकर तालुका प्रतिनिधी अनिल मंजुळकर यांना सत्यस्पर्शी पत्रकारिता पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. 
 

मुळचे मेहकर तालुक्यातील गोमेधर येथील असलेले व सध्या जानेफळ येथे वास्तव्यास असलेले अनिल मंजुळकर निर्भिड पत्रकारितेसाठी परिचित आहेत. गुन्हेगारीविषयक वार्तांकन, घटना घडमोडी, याशिवाय राजकीय वर्तुळातील त्यांच्या बातम्या अनेकदा गाजल्या आहेत. निर्भिड, रोखठोक पत्रकारिता करतांना त्यांच्या सामाजिक जाणिवा देखील प्रगल्भ आहेत. विविध सामाजिक कार्यात ते सक्रिय सहभागी असताना. मुख्य रस्त्यावर असलेल्या त्यांच्या स्वतःच्या शेतात त्यांनी येणाऱ्या जाणाऱ्या मुक्या प्राण्यांसाठी पाणी पिण्याची सोय केली आहे, शिवाय रस्त्याने प्रवास करणाऱ्यांना देखील शुद्ध आरओ च्या पाण्याची व्यवस्था मंजुळकर यांनी स्वखर्चातून केली आहे. 


जळगाव - जामोद संग्रामपूरात झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले तेव्हा "बुलडाणा लाइव्ह" ने मदत संकलन करण्याचे आवाहन जिल्हावासियांना केले होते. त्यावेळी मेहकर तालुक्यातून भक्कम मदत संकलन करण्याचे काम अनिल मंजुळकर यांनी केले होते. त्यांच्या या कार्याची दखल मेहकर तालुका ग्रामीण पत्रकार संघ व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेने घेतली व त्यांना सत्यस्पर्शी पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरविले. मेहकर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन चनेवार व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष संतोष अवसरमोल यांनी  आयोजित केलेल्या कार्यक्रमात जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी यांनी अनिल मंजुळकर यांचा गौरव केला. मेहकरचे उपविभागीय अधिकारी दिनेश गीते यांच्यासह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.