बुलडाण्यात अंगणवाडी सेविकांचा थाळीनांद! म्हणाल्या, आता सरकारला विनंती नाही,सूचना....

 
Hxhxj
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी मागील एका महिन्यांपासून राज्यात आंदोलन सुरु आहे.वेतनश्रेणी लागू करून पगारवाढ द्यावी अशी प्रमुख मागणी महिला कर्मचाऱ्यांनी मांडली आहे. यासंदर्भात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज, १ जानेवारीला बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर थाळीनाद करण्यात आला. त्यासोबतच सरकार विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.
यावेळी शेकडो महिला कर्मचारी एकत्रित जमल्या होत्या. माध्यमांशी बोलताना महिला कर्मचारी म्हणाल्या
 की, आता सरकारला विनंती नाही आम्ही सूचना देतोय, येत्या ३ तारखेला मुंबईत अंगणवाडी सेविकांचे राज्यव्यापी आंदोलन होणार आहे
   सरकारने आमच्या मागण्यांकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरे जाण्यासाठी तयार राहावे, असा इशारा अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दिला.