अंचरवाडीजवळ संत्र्याचा ट्रक उलटला! लोकांनी पोते भरून नेले...

 

अंचरवाडी (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अंचरवाडी ते अंढेरा फाट्यादरम्यान एक संत्र्याचा ट्रक उलटला आहे. रस्त्याच्या खाली हा ट्रक उलटला असून लोकांनी पोते , पोतड्या,मिळेल त्याने संत्रे भरून घरी नेले आहेत.

 या अपघातात एक जण जखमी झाला आहे.महाराष्ट्रातून ही संत्री केरळ मध्ये नेण्यात येत होती. अंचरवाडी ते अंढेरा दरम्यान असलेल्या वळणावर ट्रक उलटून रस्त्याच्या खाली डोंगरउतारावरून घसरत गेला. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या लक्षात येताच लोकांनी मिळेल त्यात संत्री भरून नेल्या. सध्या संत्र्याच्या ट्रक अर्धा खाली झाला असून अजूनही लोक ट्रक वर तुटून पडले आहेत.