डोळ्यांचे पारणे फेडणारा कार्यक्रम! भव्य महिला बचतगट प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा थाटात! चित्रपट दिग्दर्शक निलेश जळमकरांच्या हस्ते झाले उद्घाटन;

बुलडाणेकरांसाठी दोन दिवस राहणार मेजवानी; १३० स्टॉल पाहण्यासारखे...
 
जक
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनच्या वतीने आयोजित भव्य जिल्हास्तरीय महिला उद्योजक तथा बचतगट प्रदर्शनीचा दिमाखदार उद्घाटन सोहळा आज,४ नोव्हेंबरच्या दुपारी मोठ्या थाटात संपन्न झाला. दिशा फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्षा जयश्रीताई शेळके यांच्या पुढाकारातून आयोजित या प्रदर्शनीचे उद्घाटन चित्रपट दिग्दर्शक निलेश जळमकर यांच्या हस्ते झाले. आमदार धिरज लिंगाडे, आमदार राजेश एकडे, गणेश पाटील, श्याम उमाळकर, संजय राठोड, विजय अंभोरे,राजर्षी शाहू मल्टीस्टेटच्या अध्यक्षा मालतीताई शेळके, स्वातीताई वाकेकर, लक्ष्मणराव घुमरे, रामविजय बुरुंगले, सत्येंद्र भुसारी, हाजी रशीद खा जमादार यांच्यासह अनेकांनी यावेळी उपस्थिती होती. चिखली रोडवरील शासकीय बीएड कॉलेजच्या मैदानावर हा कार्यक्रम संपन्न झाला.
आज आणि उद्या ही प्रदर्शनी राहणार आहे. दिशा महिला बचतगट फेडरेशनच्या जिल्हाभरातील विविध बचत गटांचे १३० स्टॉल या प्रदर्शनीत आहेत. या स्टॉल वर बचतगटांनी उत्पादित केलेला माल विक्रीसाठी उपलब्ध आहे, याशिवाय जिल्ह्याच्या खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडवणारे विविध स्टॉल देखील या प्रदर्शनीत लावण्यात आले आहेत. जिल्हाभरातून बचतगटांच्या महिलांची, महिला उद्योजकांची या कार्यक्रमाला भगरच्च उपस्थिती आहे..