शिवजन्मोत्सव कार्यक्रमासाठी आलेल्या खा.अमोल कोल्हेंची कृषी मित्र सचिन बोंद्रे यांनी घेतली भेट..!

 
bondre
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): संबंध महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले शिवपुत्र संभाजी महाराज महानाट्यातील मुख्य अभिनेते खासदार अमोल  कोल्हे यांची ग्रामदैवत आई रेणुका मातेच्या चिखली नगरीत कृषी मित्र, माजी नगरसेवक सचिन  बोंद्रे यांनी भेट घेतली. सामाजिक, राजकीय, कृषी विषयांवर यावेळी चर्चा झाली. 

 महाराष्ट्रातील अविकसित प्रश्नांवर, प्रामुख्याने देशाच्या सर्वोच्च सभागृहात शेतकऱ्यांप्रतीच्या मागण्या कृषी मित्र सचिन बोंद्रे यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यासमोर मांडल्या.लवकरच शेतकऱ्यांच्या हित्याच्या न्याय मागण्यासाठी आपण सभागृहात मागणी करू अशी ग्वाही यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी दिली. सविस्तर चर्चा संपन्न झाल्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनी खास स्नेहभोजनाचा आनंद सुद्धा घेतला. यावेळी  पत्रकार निवेदक गणेश धुंदळे, अमोल सुरडकर, व्यंकटेश बोंद्रे ,ओम दुकानदार व खासदार अमोल कोल्हे यांना मानणारा चाहता वर्ग उपस्थित होता.