Amazon Ad

अमोना गावात कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना खरीपपूर्व मार्गदर्शन! हुमणी अळीवर कसे मिळवायचे नियंत्रण ते सांगितले; सोयाबीनच्या अष्टसूत्रीवरही चर्चा..

 
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) चिखली तालुक्यातील अमोना गावात शेतकऱ्यांसाठी खरीप पूर्व व अळी नियंत्रण मार्गदर्शन सभा २० मे रोजी संपन्न झाली. कृषी विभागातर्फे या सभेचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील शेकडो शेतकऱ्यांना यावेळी शेतीविषयक मार्गदर्शन मिळाले. या कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामाची पूर्व तयारी, हुमनी अळीवर कसे नियंत्रण मिळवायचे, सोयाबीन पेरतांना कशी काळजी घ्यावी याबद्दल विशेष मार्गदर्शन मिळाले.
    गावातील दत्त मंदिर संस्थान सभागृहा ही सभा पार पडली. यावेळी कृषी सहाय्यक बी.एस.पवार यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान स्वीकारले. कृषी सहाय्यक मयुरी ठेंग, एस.एस. खेडेकर, जी. डी. सवडतकर, के.जी. गिरी, एस.एस सोनुने, योगेश्वर सरोदे, विजय जोगदंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मार्गदर्शन सभेत कृषी सहाय्यक खेडेकर यांनी सोयाबीन पिंकांची अष्टसूत्री सांगितली. तसेच बीज प्रक्रिया, वाणांची निवड, पेरणी, खत व तन व्यवस्थापन कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले. कृषी सहाय्यक योगेश्वर सरोदे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच कृषी सहाय्यक मयुरी ठेंग यांनी सांगितले की, मागील वर्षी अमोना शिवारात हुमणी अळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढले होते. यंदा हे प्रमाण वाढू नये यासाठी उपाययोजना करण्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी अमोना शिवारातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.