बुलडाण्यात सकल मराठा समाज कॅफे च्या विरोधात आक्रमक! कॅफेत पलंग कशाला? समाजाचा सवाल? पोलिसांनी सगळ्या कॅफेचालकांना ठाण्यात बोलावले...! "गुलुगुलू" करणाऱ्या मजनुंनाही उचलले..

(जाहिरात👆)
बुलडाणा शहरातील कॅफेत स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार सुरू असल्याचा आरोप होतोय. शहरातील अनेक कॅफेत पलंग, छोट्या रुमला दरवाजा कडी असून त्याच्या आड प्रेमीयुगल नको त्या गोष्टी करीत असल्याचा आरोप सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला. या प्रकारामुळे अनेक सामाजिक समस्या पुढे येत असून त्यामुळे यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली.
निवेदनाचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस विभागाला आवश्यक त्या सूचना केल्या. त्यानंतर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी तातडीने पोलीस पथकांना कॅफेची झाडाझडती घ्यायला पाठवले. यावेळी काही मजनूंना रंगेहाथ हात पकडण्यात आल्याचे समजते. दरम्यान शहरातील सगळ्या कॅफेचालकांना पोलिसांनी ठाण्यात बोलावले असून पुढील कारवाई सुरू आहे.