पेपरला बातमी वाचली अन् ८० वर्षाचे शेतकरी राजाभाऊ देशमुख बीड जिल्ह्यातून एसटीने एल्गार महामोर्चासाठी बुलडाण्यात आले;

म्हणाले, मला दरवर्षी ६० -७० क्विंटल सोयाबीन व्हायची यंदा फक्त २४ क्विंटल झाली; माझी अन् रविकांत तुपकरांची प्रत्यक्ष ओळख नाही पण...
 
Aajoba
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वातील एल्गार महामोर्चा आज ,२० नोव्हेंबरच्या दुपारी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या महामोर्चासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी बुलडाण्यात दाखल होत आहेत. कर्नाटक राज्याचे शेतकरी नेते राजू पवार हेदेखील बुलडाण्यात दाखल झाले आहेत.
बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील ८० वर्षीय शेतकरी राजाभाऊ देशमुख काल एसटी बसचा प्रवास एल्गार रथयात्रेचे शेवटचे गाव असलेल्या किन्होळा गावात पोहचले. पेपरला एल्गार महामोर्चाची बातमी वाचून आल्याचे त्यांनी सांगितले. " रविकांत तुपकर आणि माझी प्रत्यक्ष ओळख नाही, मात्र या माणसाचे भाषण मी आमच्या भागात ऐकले आहे, हा शेतकऱ्यांसाठी निस्वार्थपणे लढणारा एकमेव माणूस आहे, एल्गार महामोर्चाची बातमी पेपरला वाचण्यात आली. माझी देखील सोयाबीनची शेती आहे, दरवर्षी ६० -७० क्विंटल व्हायची, यंदा दुष्काळ असल्याने २४ -२५ क्विंटल झाली. आपल्यासाठी लढणाऱ्या माणसासोबत राहिलेच पाहिजे.." असे राजाभाऊ देशमुख बुलडाणा लाइव्ह शी बोलताना म्हणाले.