Amazon Ad

ॲड. शर्वरीताई तुपकरांनी सर्वात आधी गाठले गणेशपूर! अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची केली पाहणी

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  काल ९ एप्रिल रोजी खामगाव तालुक्यातील गणेशपुर व परिसरात अवकाळी पाऊस व गारपीटीने थैमान घातले. यामुळे मोठ्या प्रमाणात घरांचे आणि शेतीचे नुकसान झाले. यावेळी तासाभराच्या आत सर्वात आधी रविकांत तुपकर यांच्या पत्नी ॲड. शर्वरीताई तुपकरांनी गणेशपूर गाठून शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली व शेतकऱ्यांना धीर दिला.

Nsnb

Nn

                 Advt

काल झालेल्या अवकाळी पावसामुळे गणेशपूर येथे मोठ्या प्रमाणात शेतीपिकाचे नुकसान झाले. ज्वारी, बियाचा कांदा व गव्हाचे मोठे नुकसान झाले. पशुधनाची देखील हानी झाली. यावेळी नुकसानीची माहिती मिळताच तातडीने ॲड.शर्वरीताई तुपकर यांनी गणेशपूर गाठले. नुकसानीची पाहणी करून त्यांनी ग्रामस्थांना धीर दिला. सध्या निवडणुकीची धामधूम सुरू असली तरी शेतकऱ्यांच्या नुकसान इकडे दुर्लक्ष न करता प्रशासनाने खात्रीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळवावी, त्यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे.