समृध्दी महामार्गाच्या पुलाखाली अपघात! एसटी बस टिप्परला धडकली;२४ प्रवासी जखमी,३ गंभीर! मेहकर तालुक्यातील घटना
Mar 24, 2023, 14:58 IST

मेहकर(अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): समृध्दी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला तेव्हापासून जिल्ह्यात त्या मार्गावर अनेक अपघात झालेत. दरम्यान आज,२४ मार्चला आज आणखी एक अपघात झाला. हा अपघात समृध्दी महामार्गावर झाला नसला तरी महामार्गाच्या पुलाखाली झालाय. या अपघातात एसटी बस रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्परला धडकली.
अपघातात २४ जण जखमी झाल्याचे वृत्त असून त्यातील तिघे गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. खामगाव कडून मेहकरच्या दिशेने ही बस जात होती. अपघातात बसच्या पुढील भागाच्या चेंदामेंदा झाला. अपघातातील जखमींना मेहकरच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.