लोणार सरोवराच्या काठावर अपघात; इनोव्हा कार ने खाल्ल्या ३ - ४ पलट्या! १ ठार तिघे जखमी..

 

लोणार(प्रेम सिंगी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोणार सरोवराच्या काठावर किन्ही रोडवर आज,१८ नोव्हेंबरच्या सायंकाळी भीषण अपघात झाला. भरधाव इनोव्हा कारने ३ -४ पलट्या खाल्ल्या, या अपघातात १ जण ठार तर तिघे गंभीर जखमी झाले.

 सूरज शिवाजी गुडवे(२५, रा.ठाणे) असे मृतकाचे नाव आहे.  लोणार सरोवराच्या गेट च्या पुढे सायंकाळी ५ च्या सुमारास हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच लोणार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे..