आदिवासी कोळी महादेव जमातीचे अनोखे आंदोलन! चक्क देवी देवतांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर! म्हणाले कलेक्टर जाणीवपूर्वक...

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी आदिवासी कोळी जमातीचे महिनाभरापासून आंदोलन सुरू आहे, आधी अन्नत्याग नंतर साखळी उपोषण सुरू झाले. नाना प्रकारचे आंदोलन आंदोलकांनी केली आहेत. त्याच शृंखलेत आज १४ फेब्रुवारीला अनोखे आंदोलन पाहायला मिळाले. जिल्हाधिकऱ्यांना चक्क देवी देवता देण्यासाठी आंदोलक निघाले होते.मात्र प्रवेशद्वारावरच पोलिसांनी त्यांना रोखले.
  या अनोख्या आंदोलनाविषयी आंदोलक गणेश इंगळे सांगतात, अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्रा विषयी कलेक्टर म्हणाले की, जिल्ह्यात कोळी महादेव जमात नाही, त्यामुळेच आम्ही आज आमचे देवी देवता कलेक्टर साहेबांना देण्यासाठी आलो आहोत. मात्र देता येत नाही असे सांगून आम्हाला रोखण्यात आलं,
अश्या प्रकारे कलेक्टर जाणीवपूर्वक अन्याय करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. यावेळी काही काळ परिसरात तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. जवळपास अर्धातास हे आंदोलन चालले पुढे आंदोलकांनी प्रवेशद्वारासमोरच ठिय्या मांडला होता.