बुलडाण्यात उद्या अनोखा कार्यक्रम! तब्बल १०० वर्षानंतर होणार ऐतिहासिक सोहळा; प्रा.दत्तात्रय लहानेंच्या पुढाकारातून विधवा परिषदेचे आयोजन;

विधवा भगिनींना आत्मनिर्भर करण्यासाठी होणार विचारमंथन; आ.डॉ.शिंगणे, जिल्हाधिकारी किरण पाटील राहणार उपस्थित! बुलडाणा लाइव्ह वर पाहता येणार थेट प्रक्षेपण....
 
Lahane

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधवा महिलांना सन्मानजनक वागणूक मिळावी, विधवा विवाहाला प्रोत्साहन मिळावे व त्यांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होता यावे, यासाठी बुलडाण्यात उद्या, १० डिसेंबर रोजी विधवा महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा फुले यांच्या नंतर १०० वर्षानी होणारी विधवा परिषद ऐतिहासिक आहे. यात सहभागी होण्याचे आवाहन प्रा. डी एस लहाने यांनी केले आहे.

Hdhx
बुलडाणा येथील तुलसी नगर येथे विधवा महिला परितक्ता परिषदेचे आयोजन शिवसाई परिवार व मानस फाउंडेशनद्वारा करण्यात आले आहे. विधवा पुनर्विवाहास प्रोत्साहान मिळावे, विधवा महिलांना आर्थीक आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न, शासनस्तरावर विधवांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, आदी या परिषदेचा उद्देश असल्याचे शिवसाई परिवाराचे अध्यक्ष दत्तात्रय लहाने यांनी स्पष्ट केले आहे. या ऐतिहासिक परिषदेच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे तर उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी
सांगितले. 
  पालकांनी पुढाकार घ्यावा : शाहिना पठाण
  सामाजिक बदल सहजासहजी होत नाही. त्यासाठी डोळस लोकांनी पुढे आले पाहिजे. विशेषतः ज्याची मुलगी विधवा आहे अश्या पालकांनी पुढाकार घेऊन या परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या शाहिना पठाण यांनी केले आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण बुलडाणा लाइव्ह च्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर करण्यात येणार आहे. १० डिसेंबरला सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे...!