काळीज पिळवटून टाकणारी घटना! नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी जवळ भल्या पहाटे झोपलेल्या मजुरांना ट्रकने चिरडले! ५ मजुर ठार; ट्रकचालक गेला पळून

 
,flld

नांदुरा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी  येथील काही मजुरांना आज पहाटे ५:३० वाजेच्या सुमारास भरधाव   वेगात येणाऱ्या ट्रकने चिरडले. या घटनेत ४ मजुरांचा जागीच तर एकाचा उपचारादरम्यान  मृत्यू झाला आहे. असे एकूण पाच मजूर या घटनेत दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेले आहेत. 

 घटनेतील सर्व मजूर नागपूर - मुंबई या राष्ट्रीय महामार्गात गेल्या अनेक दिवसांपासून काम करत होते. पहाटे निद्रावस्थेत असतानाच    PB-11-CZ-4074  क्रमांक असलेला आयशर ट्रकने मजुरांना चिरडले. त्यानंतर ट्रक चालक फरार झाला होता.याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.प्रकाश दांडेकर (वय २६ वर्ष), पंकज जांभेकर (१९), अभिषेक जांभेकर (१८), दीपक बेलसरे अशी नावे जागीच मृत्यू झालेल्यां मजुरांची आहे. घटनेतील जखमींवर मलकापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.