बुलडाण्यात बेडकांचा तलाव! सापांचा सुळसुळाट; जीव मुठीत धरून फळविक्रेत्यांना.....

 
Jhvc

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) पावसाळा आला की, ठिकठिकाणी असलेल्या खुल्या मैदानात तलाव तयार होतात. त्यात बेडकांचा रहिवास मोठ्या प्रमाणात दिसून येतो, तर मैदानातील दूषित पाण्यामुळे रोगराई पसरते. शहरातील विश्रामगृहा समोरील असलेल्या खुल्या मैदानातही पाणी साचले असून पाण्यावर अस्वच्छतेची चादर पसरली आहे. हे ठिकाण शहरातील मध्यवर्ती भागात येत असून लागून असलेल्या रोडवरून दररोज क्लास वन दर्जाचे अधिकारी ये - जा करतात. रस्त्याच्या कडेला लागूनच फळ विक्रेत्यांची अनेक दुकाने आहेत. पाणी साचलेल्या मैदानात घनदाट असे गवतही दाटले आहे. यामुळे सर्पाची भीती वाटत असल्याचे समजले. 

 स्थानिक विश्रामगृहासमोरील खुल्या मैदानात दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचते. योग्य ती काळजी घेतली नसल्याने तिथे घनदाट असे गवतही वाढतात. परिणामी सायंकाळी आणि रात्रीच्या सुमारास या ठिकाणी बेडकांचा मोठा वावर असल्याचे दिसून आले. इतकेच नाही तर, साचलेल्या पाण्यावरती अस्वच्छतेची चादर पसरली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठी हानी आणि दुर्गमतेचा सामना करावा लागत आहे. शहरातील विविध प्रभागांमध्ये नगरपालिकेतर्फे मान्सूनपूर्व स्वच्छता अभियान राबवण्यात आले. परंतु असे असताना खुल्या मैदानात अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर हे चिंताजनक आहे. नगरपालिकेने योग्य त्या उपाययोजना राबवून खुली मैदाणे स्वच्छ केली पाहिजे अशी मागणी होत आहे.