BREAKING बुलडाण्यात अग्नीतांडव! जिल्हा परिषदेसमोरील गॅरेज दुकानाला लागली आग; लाखोंचे नुकसान, आज सकाळची घटना

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) जिल्हा परिषदेच्या समोरील जागेत असणाऱ्या एका चारचाकी वाहनाच्या गॅरेज दुकानाला आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास अचानक लागली. दरम्यान माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन वाहन दाखल झाले आहे. आधी रौद्रस्वरूपात असलेली आग आता आटोक्यात आली आहे. आगीचे कारण अस्पष्ट आहे, तरी शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.  
 गॅरेज दुकानाच्या आतील सर्व बॅटऱ्या, गॅरेजची साहित्य जळून खाक झाले आहेत. शेख अमीन(रा. टिपू सुलतान चौक) असे गॅरेज मालकाचे नाव आहे. चार चाकी वाहनांचे इंजिन ऑइल, तसेच रिपेरिंग साठी इतर साहित्य दुकानात ठेवण्यात आले होते. महागड्या बॅटऱ्या सुद्धा दुकानात होत्या. मात्र अचानक लागलेल्या आगीने सर्वच खाक झालेल आहे.या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.