वाघाची शिकार आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल...

 
बुलढाणा
बुलढाणा ( बुलढाणा लाइव वृत्तसेवा): आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिवजयंतीला एक विशेष पोशाख आमदार गायकवाड यांनी परिधान केला होता, त्यावेळी त्यांच्या गळ्यात वाघाचा दात देखील होता. एका स्थानिक माध्यमांशी बोलताना आपण 1987 ला वाघाची शिकार केल्याचे वक्तव्य आमदार गायकवाड यांनी केलं होतं दरम्यान आता हे वक्तव्य आमदार गायकवाड यांच्या चांगलंच अडचणीत आल आहे. आमदार गायकवाड यांच्या विरोधात भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 19 72 अंतर्गत वन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या कार्यक्रमात आमदार संजय गायकवाड यांनी शिवकालीन पोशाख परिधान केला होता. यावेळी स्थानिक माध्यमांशी बोलताना "मी 1987 ला वाघाची शिकार केली होती" असं विधान त्यांनी केलं होतं. दरम्यान या प्रकरणाची चर्चा झाल्यानंतर वनविभागाने हे प्रकरण चांगलेच गांभीर्याने घेतले होते. कालच आमदार गायकवाड त्यांच्याकडील ती दातसदृश्य वस्तू ताब्यात घेऊन तपासणीसाठी देहरादून येथे पाठवण्यात आल्याचे वनविभागाने प्रसिद्धी पत्रकारमध्ये म्हटले आहे.