"त्या" घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदु समाजाच्या वतीने आज उदयनगर बंद चे आवाहन! उदयनगरात पोलीस बंदोबस्त वाढवला; विश्व हिंदु परिषदेचे पदाधिकारी आज एसपींना भेटणार ​​​​​​​

 
crime

चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अकोला जिल्ह्यातील आलेगाव येथील हिंदू तरुणाचे धर्मांतरण केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला होता. शिवाय त्या तरुणाच्या कुटुंबाला सुद्धा मुस्लिम झाला नाहीत तर जीवाने मारून टाकू  अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप तरुणाच्या आईने केला होता. आपल्या मुलाला उदयनगर येथील मदरशात ठेवल्याचे तरुणाच्या आईने म्हटले होते. विविध  मध्यामांत या संबधीचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. 

add 

               जाहिरात

या घटनेच्या निषेधार्थ आज,१४ जुलैला उदयनगर बंद ठेवण्याचे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर उदयनगरात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या हिंदुत्ववादी संघटना या प्रकारामुळे आक्रमक झाल्या आहेत. "त्या तरुणाला मुस्लिम बनवण्याचा उद्देश काय होता? मुस्लिम धर्म स्विकारला तर तुम्हाला पैसे देऊ असे आरोपी तरुणाच्या कुटुंबाला म्हणतात तर हे पैसे कोण पुरवतो? संबधित मदरशात आतापर्यंत किती धर्मांतरीत तरुणांना ठेवण्यात आले?" या  प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत तशी चौकशी झाली पाहिजे असे विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा महामंत्री माधव धुंदाळे म्हणाले. आज बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटून मागण्यांचे निवेदन देणार असल्याचे ते म्हणाले.