वन विभागाची मोठी कारवाई! गिरडा वनक्षेत्रातून सागवान वृक्षाची होणारी अवैध वाहतूक रोखली! पाच लाखांच्या मुद्देमालासह दोघांना घेतले ताब्यात..

 
Hdhd
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गिरडा परिसरात सागवान वृक्षाची कत्तल होत असल्याची धक्कादायक माहिती वन विभागाला मिळाली. त्याआधारे सहाय्यक उपवनसंरक्षक अभिजीत ठाकरे यांनी पथकासह गोतमारा या ठिकाणी काल रात्री धाड टाकली. आज २१ फेब्रुवारी, बुधवारच्या सकाळपर्यंत चाललेल्या या धाडसी कारवाईत जवळपास पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 
 प्राप्त माहितीनुसार, गिरडा परिसरातून अवैधरित्या सागवानाची वाहतूक करणाऱ्या व्यक्तीला वन विभागाने ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार गोतमारा भागातील सुताराच्या कामठ्यावर वन विभागाने धडक देत कारवाई केली. जप्त करण्यात आलेला लाकडाचा माल व साहित्य शासकीय वाहनाद्वारे बुलढाणा येथील लाकूड डेपोत आणण्यात आला. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध वन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.