१२ वर्षीय चिमुकलीच्या पोटात दुखत होते! सिटीस्कॅन केल्यावर धक्काच बसला; पण डॉ.अभिलाष माळी अन् त्याच्या टीमने सगळ काही ओके केलं.! चिमुकलीच्या पालकांनी मानले डॉक्टरांचे आभार;

विद्याविश्र्व हॉस्पिटलमध्ये पार पडली गुंतागुंतीची शस्त्रक्रिया...
 
Nxnnx
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): डॉक्टरांना आपल्या संस्कृतीत देवस्वरुप मानल्या गेलंय..डॉक्टर खरचं देवस्वरुप असतात याचा प्रत्यय नुकताच बुलडाण्यात आलाय..१२ वर्षाच्या चिमुकलीच्या पालकांनी बुलडाण्यातील विद्याविश्र्व हॉस्पिटलचे संचालक डॉ.अभिलाष माळी आणि टीमचे आभार मानले आहेत. अर्थात त्याला कारणही तसंच आहे....
   
१२ वर्षीय चिमुकलीच्या पोटात मुका मार लागलेला होता. तिच्या पोटात ४ दिवसांपासून दुखत होते. तिच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांना दाखवले, घरघुती उपचार केला मात्र कोणताही फरक पडत नव्हता. आजाराचे योग्य ते निदान होत नव्हते. चिमुकलीला वेदना सहन होत नव्हत्या, त्या पाहून कुटुंबीयांची चिंता वाढत होती. अखेर विद्याविश्व हॉस्पिटलचे उच्चविद्याविभूषित डॉ.अभिलाष माळी यांच्याकडे चिमुकलीला दाखल करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. डॉक्टरांनी तातडीने सोनोग्राफी आणि सिटीस्कॅन करण्याचा निर्णय घेतला. त्यातून चिमुकलीच्या पोटदुखीचे खरे मात्र अतिशय गंभीर कारण समोर आले..
  प्लीहा अवयवाला झाली होती इजा...
  चिमुकलीला मुका मारल्याने पोटातील प्लीहा (spleen) या अतिशय महत्वाच्या अवयवाला दुखापत झाल्याचे समोर आले. दुखापत झाल्याने पोटात रक्तस्राव होत होता. अखेर डॉ.अभिलाष माळी यांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. चिमुकलीच्या कुटुंबीयांना करण्याचा निर्णय घेतला. चिमुकलीच्या कुटुंबीयांना तशी माहिती देण्यात आली. चिमुकलीच्या कुटुंबीयांना आधी भीती वाटली मात्र डॉक्टरांनी कुटुंबियांच्या सर्व शंकांचे निरसन केल्यानंतर शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली. शस्त्रक्रिया झाल्याने रक्तस्राव थांबला व प्लीहा (spleen) बाहेर काढण्यात आली. ही शस्त्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची समजल्या जाते, मात्र डॉ.अभिलाष माळी यांनी आपले कौशल्य पणाला लावून चिमुकलीला धोक्याबाहेर काढले. या शस्त्रक्रियेसाठी भुलतज्ञ म्हणून डॉ. रेणुका हिंगणे व डॉ.अजिंक्य वानेरे यांनी सहयोग केले. चिमुकली सध्या धोक्याच्या बाहेर असून विद्याविश्र्व हॉस्पिटलच्या सर्जिकल आयसीयू मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यावेळी चिमकलीच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांचे आभार मानले..
आता सर्व शस्त्रक्रिया बुलडाण्यातच..
जिल्हाभरातील अनेक रुग्णांना अवघड शस्त्रक्रिया करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर किंवा इतर मोठ्या शहरांमध्ये जावे लागत होते. त्यावर मोठा आणि आवाक्याबाहेरचा खर्च होत होता. मात्र आता सर्व प्रकारच्या अवघड, किचकट, गुंतागुंतीच्या समजल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया बुलडाण्यातच करण्याची सोय डॉ.अभिलाष माळी यांच्या विद्याविश्व हॉस्पिटल मध्ये करण्यात आली आहे. सर्व प्रकारच्या शस्त्रक्रीया दुर्बिणीद्वारे (लॅप्रोस्कोपी व एन्डोस्कोपी) करण्याची सुविधा येथे २४ तास उपलब्ध आहे. (मॉडुलार ऑपरेशन थिएटर, अत्याधुनिक ॲनेस्थिशिया वर्क स्टेशन, डीलक्स रूम, सुसज्ज सर्जिकल आय.सी.यु., अत्याधुनिक लॅप्रोस्कोपी व एन्डोस्कोपी मशीन उपलब्ध आहे. लहान मुलांनी गिळलेली नानी, हेअर पिन, कुठलीही वस्तू एन्डोस्कोपी पद्धतीने काढण्याची शस्त्रक्रिया,ब्रेस्ट सर्जरी (स्तनाची शस्त्रक्रिया),हर्निया सर्जरी,ट्रॉमा व क्रिटीकल केअर,
दुर्बिनव्दारे अपेंडिक्स, पित्ताशयाची शस्त्रक्रिया, शरिरावरील विविध गाठीचे निदान व शस्त्रक्रिया,पोटाची व छोट्या आतडीची शस्त्रक्रिया, लहान मुलांची शस्त्रक्रिया भगंदर व फिशर शस्त्रक्रिया, मुळव्याध तसेच गर्भपिशवीची शस्त्रक्रिया,थॉयरॉईड ग्रंथीचे आजार व शस्त्रक्रिया यासारख्या आजारांवर उपचाराची सुविधा उपलब्ध आहे.
डॉक्टरांचा पत्ता: विद्याविश्र्व हॉस्पिटल, मेहेत्रे हॉस्पीटल जवळ, वानखेडे ले आऊट बुलडाणा..संपर्क: 7888058250