तू माझ्यासोबत आताच आली, इतक्या लवकर प्रेग्नंट कशी झाली... पतीचा पत्‍नीवर संशय!, तिची बुलडाणा पोलिसांत धाव

 
755
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरातील सुंदरखेडमधील २७ वर्षीय विवाहितेने पतीसह सासरच्यांविरुद्ध छळाची तक्रार केली असून, शहर पोलिसांनी पतीसह सासू, सासरे, दीर, नणंद, नंदोई यांच्याविरुद्ध गुन्हा काल, २२ एप्रिलला गुन्हा दाखल केला आहे.

विवाहितेचे माहेर चैतन्यवाडीचे असून, सुंदरखेडमधील जुनागावातील एका पोलिसासोबत तिचे लग्न झाले होते. ७ लाख रुपये हंुडा ठरला होता. पैकी ३ लाख रुपये द्यायचे राहिले होते. पती मुंबईला नोकरीला असल्यामुळे ती नांदण्यास मुंबईला गेली होती. दोन- तीन महिने चांगले वागवल्यानंतर सासरच्यांनी उरलेले हुंड्याचे पैसे मागायला सुरुवात केली.

त्‍यासाठी पती मारहाण करू लागला. त्रास असह्य झाल्याने तिची प्रकृती बिघडली. पतीने तिला माहेरी बुलडाण्याला पाठवून दिले. कोलवडला चांगली मुलगी आहे. ते हुंडासुध्दा जास्त देतात. हिला सोडून दे, असे तिच्या पतीला सासरची अन्य मंडळी सांगू लागली. विवाहिता परत नांदायला गेल्यानंतर पती तिला पुन्हा मुंबईला घेऊन गेला.

तिथे दोन महिने झाल्यानंतर विवाहिता गर्भवती झाली. ही बाब पतीला कळताच तो तिच्यावर संतापला. तू माझ्यासोबत आताच आली... इतक्‍या लवकर प्रेग्नंट कशी राहिली..? असे विचारून हे मूल माझे नाहीच, असे म्हणून त्‍याने तिला मारहाण केली. यामुळे तिची प्रकृती बिघडली. तिने वडिलांना फोन करून सांगितल्याने त्‍यांनी तिच्या आई व आजीला मुंबईला पाठवले.

तिथे उपचार करवले. त्‍यानंतर पतीने तिला वागवण्यास नकार दिला. १७ मार्च २०२१ पासून ती बुलडाण्याला माहेरी आली. २० ऑक्‍टोबर २०२१ रोजी तिला मुलगी झाली. मात्र ती जन्‍मल्यानंतर लगेच वारली. त्‍यानंतरही सासरचे कुणीच तिला भेटायला आले नाही. तपास नापोकाँ सुभाष म्हस्के करत आहेत.