तेरवीचा असा कार्यक्रम तुम्ही नसेन पाहिला! चिखलीत २५ तरुणांनी समाजासमोर ठेवला नवा आदर्श!

 
rt
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) मृत्यूनंतरच्या विधी कार्यातील तेराव्या दिवशी रुढीपरंपरेने अनेक विधी केल्या जातात मात्र चिखली येथील युवकांनी तसेच रामा फाउंडेशनने तेरवीच्या दिवशी रक्तदान शिबिर घेऊन समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. या शिबिरामध्ये २५ जणांनी रक्तदान केले आहे.     

तेरा दिवसापूर्वी चिखली देऊळगाव राजा रोड वरील बेराळा फाट्यावर किसनराव गुलाबराव मोरे व त्यांच्या पत्नी गिताबाई किसनराव मोरे यांच्या स्कुटीचा एसटी बस सोबत अपघात झाला. या अपघातामध्ये किसनराव मोरे हे गतप्राण झाले होते त्यांच्या पत्नी गिताबाई यांना सुद्धा गंभीर  स्वरूपाचे फॅक्चर झाले होते. दरम्यान ऑपरेशन वेळी त्यांना चार बॉटल रक्त हवे होते आणि ते तात्काळ हवे असल्याने मोरे ,राजपूत व गाडेकर  परिवारातील युवकांनी ते उपलब्ध करून दिले.  

मात्र अपघातातील संकटग्रस्त परिवाराला तात्काळ रक्त मिळण्यासाठी कश्या  स्वरूपाच्या अडचणी निर्माण होतात याची कल्पना या परिवारातील युवकांना आल्याने तेरवीच्या दिवशी आपण रक्तदान शिबिराचे आयोजन ठेवू आणि गरजूंना ते रक्त सहज उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करू अशा सदभावनेने रामा फाउंडेशनचा पुढाकार आणि मोरे, राजपूत व गाडेकर परिवारातील युवकांनी आज 22 जुलै 2022 रोजी चिखली शहरातील गांधीनगर वार्ड, नंबर 17 येथे  एकीकडे परिवारावर दुःखाचे सावट पसरलेले असताना सुद्धा सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

या शिबिरामध्ये शिवाजी गाडेकर,वसुदेव मोरे,समाधान टोलमरे, गणेश खर्डे,अंकुश लोखंडे,नंदू इंगळे,एकनाथ मोरे, श्रीकांत सोळंकी,सुरेश मोरे,संजय गाडेकर,समाधान सोळंकी,अनुकूल गाडेकर,दीपक मोरे,सागर मोरे,अक्षय मांन्टे,राम सवडतकर,हितेश जवंजाळ,गोपाल जाधव,वैभव जगताप, संतोष सोळंकी,अविष्कार निकम,उमेश बावसकर,शुभम राजपुत,प्रज्वल शेळके,रवी खरात,पृथ्वी राजपूत,आशिष जाधव,यांनी रक्तदान केले .

रक्तदान करण्यासाठी जीवनधारा  बुलडाणा ब्लड बँक बुलढाणा चे  कर्मचारी तसेच रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी  पप्पु सेठ राजपुत ,डॉ मंगेश मुंढे ,प्रणव गाडेकर, शुभम गाडेकर ,ज्ञानेश्वर परिहार, बद्री मोरे,प्रतीक सोळंकी, सुजल सोळंकी, राहुल उंबरकर, श्रीकांत सोळंकी व रामा फाउंडेशन चिखली चे सर्व सदस्य  यांनी परिश्रम घेतले.याचसोबत परिवारांवरील हलके करण्यासाठी ह.भ.प रामायनाचार्य श्री अनिल महाराज चेके यांच्या  कीर्तनाचा कार्यक्रम सुद्धा ठेवण्यात आला होता.