व्वा क्या बात! राजर्षी शाहू मल्टिस्टेटला 'सहकार गौरव' पुरस्कार! सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून होणार गौरव : संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा

 
yfg

बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट को- ओपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. पुणे मार्फत दिला जाणारा सहकार गौरव पुरस्कार २०२२ करिता 'सर्वोत्कृष्ट संस्था' म्हणून राजर्षी शाहू मल्टिस्टेट को. ऑप क्रेडिट सोसायटीची निवड झाली आहे. यामुळे संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. शिर्डी येथे १३ जानेवारी रोजी एका शानदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

संस्थापक अध्यक्ष संदीपदादा शेळके यांच्या मार्गदर्शनात आणि संस्थाध्यक्षा मालतीताई शेळके यांच्या नेतृत्वात राजर्षी शाहू मल्टिस्टेट को. ऑप क्रेडिट सोसायटीने सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. दैनंदिन व्यवहारात आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सहकारात बदल घडवणारी संस्था म्हणून राजर्षी शाहू मल्टिस्टेटकडे पाहिले जाते. सामाजिक कार्यात संस्थेचा नेहमी पुढाकार असतो. विविध उपक्रमांमधून संस्थेने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना राबविणे असो की गरजूंना मदतीचा हात देणे असो, यामध्ये संस्थेचा नेहमीच पुढाकार राहिला आहे.  

  संस्थेच्या एकूणच कार्याची दखल घेऊन फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट को- ओपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. पुणे मार्फत सहकार गौरव पुरस्काराकरिता सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून निवड करण्यात आली आहे. सहकार क्षेत्रातील हा मानाचा पुरस्कार आहे. या पुरस्कारामुळे संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.