व्वा माधुरीताई! "ताई" या शब्दाचा अर्थ कर्तव्यातून दाखवून दिलात! ३० हजार भावांना पाठवल्या राख्या

 
madhuri
मेहकर( अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बहीण - भावाचे नाते अधिक  घट्ट करणारा सण म्हणजे राखी पौर्णिमा..बहीण आणि भाऊ दोघेही या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात.. मेहकरच्या सप्तशृंगी महिला अर्बनच्या अध्यक्षा माधुरीताई पवार या रक्षाबंधनाचा सण आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करत आहेत. सामाजिक कार्यात वडील देवानंद पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवत कार्य करणाऱ्या माधुरीताईंनी ३० हजार भावडांना राख्या पाठवल्या आहेत. या राखीसोबत एक भावस्पर्शी पत्रही त्यांनी आपल्या भावांना लिहिले असून सामाजिक कार्यात सहकार्य आणि तुमचे पाठबळ हीच माझ्यासाठी तुमच्या वतीने सर्वोत्तम भेट ठरेल अशा आशावाद व्यक्त केलाय.

मेहकर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष देवानंद पवार यांच्या कन्या माधुरीताई सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असतात. समाजसेवेचे हे बाळकडू त्यांना वडिलांकडूनच मिळाले आहे. उच्चविद्याविभूषित असलेल्या माधुरीताई सप्तश्रृंगी महिला अर्बन मेहकरच्या अध्यक्षा आहेत. समाजाची शैक्षणिक, आर्थिक उन्नती होऊन सुदृढ समाजनिर्मितीसाठी विविध उपक्रम त्या राबवत असतात. १२ जून रोजी त्यांनी केलेल्या भव्य महाआरोग्य शिबिरात ६ हजारांपेक्षा अधिक रुग्णांना सेवा देण्यात आली होती.

महिलांसाठी अतिशय महत्वाच्या असणाऱ्या कॉल्पोस्कोपी सारख्या २८ तपासण्या तज्ञ  स्रीरोग तज्ञांकडून या शिबिरात करण्यात आल्या होत्या. याशिवाय डोळ्यांची तपासणी करून रुग्णांना मोफत चष्मे देण्यात आले होते. आता पुन्हा रक्षाबंधनाच्या निमित्ताने माधुरीताईनी  भावंडांना राख्या पाठवून हक्काची बहीण असल्याचा परिचय दिलाय..अर्थात ३० हजार भावंडांचे आशीर्वाद आणि शुभेच्छारुपी पाठबळ माधुरीताईंच्या पाठीशी असल्याने सामाजिक कार्याची ही गती आणखी वृद्धिंगत होणार एवढे नक्की हाय..!