ड्राय डे कशाला म्हणतात रे भावा? प्रजासत्ताक दिनीच चिखली पोलिसांनी पकडली १२ हजाराची दारू..!!

 
hghhj
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणेकरांनो ड्राय डे म्हणजे काय? तर देशात असे काही दिवस ठरवलेले असतात, ज्या दिवशी दारूची दुकानं बंद ठेवली जातात. परंतु जिल्ह्यात ड्राय डे लाच मद्यपी सर्रास ओले अर्थात झिंगाट होत असल्याचे दिसून येत आहे.आज प्रजासत्ताक दिनाला चिखली ठाणेदार विलास पाटील यांनी दारूच्या बाटल्यासह १२,६२० रुपयांचा मुद्देमाल जप्तीची कारवाई केली.ही कारवाईच ड्रायडेला दारूची गंगा वाहत असल्याचे अधोरेखित करत आहे.

ड्राय डे घोषित करण्यामागे अनेक कारणं आहेत. वर्षातले काही खास दिवस राष्ट्रीय सण आणि धार्मिक सणांच्या दिवशी ड्राय डे पाळला जातो. राष्ट्रीय सण, स्वातंत्र्यसैनिक यांच्या सन्मानार्थ असलेले दिवस आणि धार्मिक सणांच्या दिवशी दारूची दुकानं बंद असतात. याशिवाय काही वेळा कायदा व सुव्यवस्थेच्या कारणावरून एखाद्या विशिष्ट शहरात किंवा राज्यात ड्राय डे जाहीर केला जातो. तसंच एखाद्या भागात निवडणुका असल्या, की त्या भागात ड्राय डे जाहीर केला जातो. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेतला जातो. परंतु याच दिवशी बुलडाणा जिल्ह्यात छुप्या मार्गाने दारू विक्री केली जाते. हे दारू विक्रेते दुप्पट भावात दारू विकून आपला खिसा भारतात. आज प्रजासत्ताक दिन असून ड्राय डे आहे.

परंतु जिल्ह्यात अवैधपणे दारू विकली जात आहे. चिखली येथील डीबी पथकातील निवृत्ती चेके, शांता मगर, उमेश राजपूत, शिवानंद तांबेकर, रामेश्वर भांडेकर, राहुल पायघन, सुनील राजपूत, निलेश सावळे,पंढरीनाथ मिसाळ यांनी चिखलीतील भीम नगर येथे घरात रेड केली. दरम्यान देशीदारूच्या बाटल्यासह १२,६२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपी अनिल मधुकर पचलोड विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी अवैध दारू विक्रीला चाप लावावा अशी मागणी जोर धरत आहे.