काय राजेहो डोक गहाण ठेवल का? मुले पळवणारा समजून बिचाऱ्या भिक मागणाऱ्याला पकडले..!

 
dongav
मेहकर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून लहान मुले चोरणारी टोळी सक्रिय असल्याची अफवा आहे. यामुळेच जळगाव जामोद मध्ये एका किन्नराला मारहाण  करण्यात आली होती. दरम्यान मेहकर तालुक्यातील डोणगाव येथेही तसाच प्रकार समोर आला असून मुले पळविण्याचा संशयावरून काही लोकांनी एका बिचाऱ्या भिक मागणाऱ्याला पकडले.

  गावात २० सप्टेंबर रोजी एक जण भिक मागत होता. दरम्यान काही जणांनी तो मुले चोरणाऱ्या टोळीचा सदस्य असल्याची अफवा पसरवली. त्यामुळे काहींनी त्याला पकडुन त्याच्याशी हुज्जत घातली. हिंदी भाषिक व गतिमंद असल्याने त्याला लोकांच्या प्रश्नांची नीट उत्तरे देता येत नव्हती. लोकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. चौकशीअंती तो मध्यप्रदेशातील दमुह जिल्ह्यातील शर्मासिंग असल्याचे समोर आले. दरम्यान गावकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवून कुणालाही मारहाण करू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.