जानेफळात हे चाललय तरी काय? आज दुसऱ्या गटाचे किन्नर एकवटले! सपना म्हणाली आम्ही खरे किन्नर ,कालचे खोटे!पहा व्हिडिओ..!!

 
kinnar
जानेफळ ( अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): किन्नरांच्या दोन गटात काल जानेफळच्या आठवडी बाजारात राडा झाला होता. त्यानंतर जिल्हाभरातील किन्नर जानेफळात एकवटले होते. आम्ही खरे किन्नर आहोत, मारहाण करणारे खोटे आहेत,त्यांनी लिंग परिवर्तन केले आहे असा आरोप त्यांनी केला होता. जानेफळ पोलीस ठाण्यात सपना आणि गजू या किन्नरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान आज, १८ सप्टेंबर रोजी सपना आणि गजु यांच्या समर्थनात जानेफळ मेहकर परिसरातील किन्नर एकवटले.  आम्ही खरे आहोत, काल ज्यांनी आमच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली ते खोटे आहेत असा दावा सपना ने केला. दरम्यान सपना व गजू यांच्या गटानेही तक्रार दिली असून दोन्ही गटाविरुद्ध परस्पर गुन्हे दाखल केले आहेत. काय म्हणाली सपना पहा व्हिडीओत...