स्वराज्य जननायीकेला काय आहे अभिप्रेत? आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे म्हणाले...
Thu, 12 Jan 2023

सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): स्वराज्य जननायीका जिजामातांनी युगपुरुष शिवरायांना घडविले. त्यांना स्वराज्य व सूराज्याची प्रेरणा दिली.ही प्रेरणा प्रत्येकासाठी आहे.राजमाता व शिवरायांच्या आदर्श विचारांच्या राजमार्गावर भावी पिढीने चालण्याची गरज आहे. समाजकारण किंवा राजकारण करत असताना, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांना अभिप्रेत असलेले रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले.
(जाहिरात👆)
सिंदखेड राजा येथे आज १२ जानेवारीला लोकमाता जिजाऊ यांचा आज जन्मोत्सव सोहळा पार पडत आहे. यावेळी सिंदखेड राजा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी डॉ. राजेंद्र शिंगणे शुभेच्छा व्यक्त करताना बोलत होते. महाराष्ट्रातील व महाराष्ट्र बाहेरील जिजाऊ भक्तांची जन्मस्थळावर मांदियाळी आहे. जिजाऊंना वंदन करण्यासाठी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित झाली आहे. पहाटेच राजे लखुजी जाधव यांच्या वंशजानी लोकमाता जिजाऊची महाआरती केली. या जन्मोत्सव सोहळ्याला जिजाऊ भक्तांचा जनसागर उसळला आहे.