कोरोनाबाबत काय म्हणतात जिल्हा शल्य चिकित्सक? जिल्ह्यात किती आयसीयु बेड, किती ऑक्सीजन? सगळ सांगितलं...

कोरोना संसर्गाबाबत जिल्हा प्रशासन योग्य ती उपाययोजना करत आहे. प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुशील चौहाण म्हणाले की, जवळपास प्रत्येक तालुक्यात आयसीयू बेड, पीआयसीयु बेड मुबलकपणे उपलब्ध आहे. बुलडाणा जिल्ह्याला लागणाऱ्या ऑक्सिजन पेक्षा दुप्पट ऑक्सिजन म्हणजे जवळपास 108 मे. टन उपलब्ध आहे.तरीही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, तसेच नागरिकांचा वावर असलेल्या सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लसीकरण प्रभावी ठरत आहे.
ज्या नागरीकांनी बुस्टर डोज अद्यापही घेतलेला नाही, त्यांनी तात्काळ बुस्टर डोज घ्यावा, तसेच गर्दी होऊ नये याबाबत दक्षता घ्यावी. नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब केल्यास कोरोनाचा संसर्ग थांबविण्यास मदत होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुशील चौहाण यांनी केले.