क्या बात! आता वर्गखोलीत झळकणार वर्गशिक्षकाचा फोटो! शासनाने सांगितले "हे" कारण..!

 
rtgfrwd
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): हो खरंय ते..!राज्यातील सर्वच शाळांमध्ये आता यापुढे वर्गखोलीत वर्गशिकाचा फोटो लावावा लागणार आहे. शिक्षण विभागाच्या आयुक्तांनी तसे आदेश दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांविषयी आदर निर्माण व्हावा आणि शिक्षकांना सुद्धा आपल्या कर्तव्याची जाणीव व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

आजकाल अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांविषयी तेवढी आपुलकी असल्याचे दिसत नाही. तर शिक्षकही आपल्या कर्तव्याला विसरून काम करत असल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये आपुलकी असेल तर अध्ययन आणि अध्यापन करणे सोयीचे जाते. त्यामुळे शिक्षण विभागाने वर्गखोलीत वर्गशिक्षकाचा फोटो लावण्याचा निर्णय घेतला. फोटो कसा असावा आणि कसा लावला यासंबंधीचे निर्देश सुद्धा देण्यात आले आहेत. यामध्ये सर्वात वरच्या बाजूला "आमचे गुरजी " असा मथळा असून त्याखाली एफोर आकारात शिक्षकांचा फोटो असणार आहे. त्याखाली वर्गशिक्षक किंवा शिक्षिकेचे नाव असणार आहे.