क्या बात! डॉ.राजेश्वर उबरहंडे यांच्या वाढदिवसानिमित्त पहेल इन्स्टिट्यूट चा अनोखा सामाजिक उपक्रम! गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना डॉक्टर बनवण्यासाठी पुढाकार;

नीट चे मोफत शिक्षण देणार; हर घर पहेल या अभियानाला होणार सुरुवात

 
dr
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा येथील पहेल इन्स्टिट्यूट शैक्षणिक कार्यासोबतच सामाजिक जबाबदारीचेही पालन सातत्याने करीत आहे. आज,२१ जानेवारी रोजी डॉ. राजेश्वर उबरहंडे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक जाण जपत "हर घर पहेल" या अभियानाचा प्रारंभ पहेल इन्स्टिट्यूट च्या वतीने केला जाणार आहे.

          dr

                                                  (जाहिरात👆)

सामाजिक क्षेत्रात नेहमीच आपले मोलाचे योगदान देणारे सामाजिक तथा राजकीय व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर राजेश्वर उबरहंडे. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे मोलाचे योगदान आयुर्वेद महाविद्यालयाच्या रूपाने सर्वांना परिचित आहे.  त्यांच्या याच कार्याची जाण ठेवत १० वी मधून ११ मध्ये जाणाऱ्या व डॉक्टर बनून रुग्णसेवेचे ध्येय बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा उपक्रम पहेल इन्स्टिट्यूट च्या वतीने राबविण्यात येणार आहे. यासाठी गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना ९०११०८८१२१ या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    काय आहे पहेल इन्स्टिट्यूट..!

 याआधी डॉक्टर बनू इच्छिणाऱ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना लातूर, कोटा, औरंगाबाद या ठिकाणी जावे लागत होते. आर्थिक दृष्ट्या सक्षम असणारे पालक पाल्यांना तिकडे पाठवत असले तरी गरीब आणि हुशार , होतकरू विद्यार्थ्यांना मात्र अनंत अडचणी येत होत्या. याच परिस्थितीमुळे मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. हीच बाब हेरून जिल्ह्यातील नामवंत प्राध्यापकांनी एकत्र येत पहेल इन्स्टिट्यूट ची सुरुवात करीत बुलडाणा शहरातच अल्प दरात "नीट" तयारी करता यावी म्हणून पहेल इन्स्टिट्यूट ची सुरुवात केली. पहिल्याच वर्षी पहेल च्या विद्यार्थ्यांना नीट परीक्षेत घवघवीत यशही मिळाले. दरम्यान पहेल इन्स्टिट्यूट च्या वतीने आता गरजू व होतकर विद्यार्थ्यांसाठी आता विविध सामाजिक उपक्रमही राबविल्या जात आहेत. त्याच उपक्रमाचा भाग म्हणून आज,२१ जानेवारीला हर घर पहेल या अभियानाची सुरुवात होत आहे.