"रविकांतभाऊ तुपकरांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या मोर्चाला आम्ही सर्वच्या सर्व हजर राहू!" सोयाबीन सोंगणाऱ्या शेतकऱ्यांनी घेतली प्रतिज्ञा; ६ नोव्हेंबरला बुलडाण्यात शेतकऱ्यांचा एल्गार..

 
khui
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  परतीच्या पावसाने जिल्ह्यात यंदा धुमाकूळ घातला. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेल्या. शेतकऱ्यांची दिवाळी अंधकारमय झाली. मात्र असे असले तरी राज्य आणि केंद्र सरकारचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष आहे. शेतकरी मेला तरी गेंड्याची कातडी पांघरलेल्या सरकारला शेतकऱ्यांचे देणेघेणे नाही. अतिवृष्टीने खचलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन व कापसाचे भावसुद्धा पाडण्यात आले, त्यामुळे सोयाबीन आणि कापसाच्या भावासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात बुलडाणा शहरात ६ नोव्हेंबरला शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा निघणार आहे. या मोर्चाच्या तयारीसाठी रविकांत तुपकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला. तुपकर यांच्या दौऱ्याला जिल्हाभरातील शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. गावोगावी झालेल्या भरगच्च गर्दीच्या सभा , बैठका यामुळे ६ नोव्हेंबरचा मोर्चा हा अभूतपूर्व ठरण्याची चिन्हे आहेत. जिल्हाभरातील शेतकरी बुलडाणा शहरात एकवटणार असल्याने पोलीस प्रशासनाने सुद्धा आतापासून बंदोबस्ताची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, आम्ही मोर्चाला येणारच अशी प्रतिज्ञा सोयाबीन सोंगणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतातच घेतली आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय..

सोयाबीन सांगण्याचे विळे हातात घेऊन व दुसरा हात समोर करून शेतकरी प्रतिज्ञा करीत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. ६ नोव्हेंबरला ,येत्या रविवारी रविकांत भाऊ तुपकरांच्या मोर्चाला आम्ही सर्वच सर्व जण हजर राहणार असल्याची प्रतिज्ञा शेतकरी करीत आहेत.
 

 पक्षाचे झेंडे बाजूला ठेवू ,शेतकरी म्हणून एकत्र येऊ..!

 गेल्या वर्षी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी रविकांत तुपकरांनी केलेले अन्नत्याग आंदोलन देशभर गाजले होते. त्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारने तुपकर यांना चर्चेसाठी आमंत्रित करून त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या होत्या. त्यामुळे ४ हजार प्रतिक्विंटल असणाऱ्या सोयाबीनच्या दरात ८ हजार रुपये प्रति क्विंटल अशी वाढ झाली होती. त्यामुळे तुपकरांच्या आंदोलनाचे परिणाम काय होतात हे आता शेतकऱ्यांना माहीत आहे. पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून शेतकरी म्हणून सगळ्यांनी या मोर्चाला यावे असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले आहे.