ग्राहक दिनी जागर, इतर दिवशी विसर; बुलडाण्याच्या तहसील कार्यालयात पार पडला जागर..!!
दैनंदिन गरजेच्या रोज कितीतरी वस्तू आपण ग्राहक म्हणून दुकानांतून विकत घेत असतो. मात्र अनेकदा ग्राहकांची अनेक बाबतींत फसवूणकही होते. तेव्हा वेळे आधीच नेमकी कुठल्या ठिकाणी नकळत फसवणूक होऊ शकते. हे समजून घेणे ग्राहकांचे कर्तव्य आहे. शिवाय प्रशासकीय यंत्रणेंनी 'जागो ग्राहक जागो' या संदर्भात जनजागृती करणे अपेक्षित आहे.
आज राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त येथील बुलडाणा तहसिल कार्यालयात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.ग्राहकांचे हक्क आणि संरक्षण कायदा अंतर्गत असलेल्या तरतुदीची माहिती आणि दुकानदाराचे कर्तव्य या संदर्भात माहिती तहसीलदार रुपेश खंडारे यांनी यावेळी दिली. ग्राहकांनी जागृत राहून कोणतीही वस्तू खरेदी करताना पावती घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाला नागरिक उपस्थित होते. दरम्यान ग्राहक संदर्भातील जनजागृतीची मोहीम इतर दिवशीही राबविण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.