लोणार तालुक्यातील बागुलखेडच्या ग्रामस्थांचा जलसमाधीचा इशारा! वाचा काय आहे कारण

लोणार तालुक्यातील बागुलखेड येथील स्वस्त धान्य दुकानदारांने जुलै ते सप्टेंबर महिन्याचे धान्य अजून वाटप केले नाही. याबाबत तालुका पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार अनेकदा तक्रार केली.परंतु कारवाई झाली नाही. शासनाची मोफत धान्य योजना पारदर्शीपणे राबविणे गरजेचे आहे. परंतु स्वस्त धान्य दुकानदाराच्या मनमर्जी कारभाराने अनेक लाभार्थी धान्यांपासून वंचित राहत आहे. दरम्यान २५ जानेवारी पर्यंत संबंधित स्वस्त धान्य दुकानदारावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा जलसमाधी आंदोलन करण्यात येईल असा इशारा भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्यांक मोर्चा तालुका अध्यक्ष शेख जावेद यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी भाजप तालुका अध्यक्ष भगवानराव सानप,शहर अध्यक्ष गजानन मापारी,भाजप नेते विजय मापारी,प्रकाश मुंढे,भाजप मिडिया संयोजक उध्दव आटोळे,युवा अध्यक्ष शुभम बनमेरू,महिला आघाडी शिलाताई खाडे,शंकर खोसरे,आबाराव हाडे,गजानन वाघमारे,बबण वाघमारे,शेख सत्तार,दिव्येश हाडे,भिमराव वाघमारे,शे.करिम,प्रकाश सोनुने,भास्कर खरात,गणेश गवळी,शे.जब्बार,सुनिल हाडे,सचिन हाडे,कठाळु घणघाव,मालता गजानन वाघमारे व कार्यकर्त्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.