केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार जिल्ह्यात दाखल! चिखली मतदारसंघात ४१ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन

 
yes
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार काल, २१ मार्चच्या रात्री  ९ वाजता चिखली येथे दाखल झाल्या. चिखली येथे मुक्कामी थांबल्यानंतर आज, २२ मार्च रोजी चिखली विधानसभा मतदारसंघातील विविध कार्यक्रमांना त्या उपस्थित राहणार आहेत.
सकाळी साडेदहानंतर धाड येथे तोरणा महिला अर्बनच्या धाड शाखेचे उद्‍घाटन त्यांच्याहस्ते होणार आहे. त्यानंतर चिखली विधानसभा मतदारसंघातील ४२.१२ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन त्यांच्याहस्ते होणार आहे. दुपारी एकला चिखली येथे जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक आटोपल्यानंतर अडीचला त्या पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर त्या नशिकसाठी प्रयाण करतील.