UPDATE अपघाताचे वृत्त कळताच आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी घेतली घटनास्थळी धाव; शोधकार्याचा घेतला आढावा..

 
jyhfv
देऊळगावराजा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पत्नीला कार शिकवीत असताना कारवरील नियंत्रण सुटल्याने कार विहिरीत कोसळून मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची आज, ३ नोव्हेंबरला देऊळगाव राजा येथे घडली. या वेदनादायी घटनेने संपूर्ण जिल्हा शोकसागरात बुडाला असताना शोधकार्य करणाऱ्या पवन पिंपळे या तरुणाचाही विहिरीत गाळात फसून मृत्यू झाला. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच संवेदनशील आमदार तथा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

 या अपघातात शिक्षक अमोल मुरकुटे यांच्या पत्नी स्वाती मुरकुटे व चिमुकली सिध्दी मुरकुटे कारसह विहिरीत बुडाल्या.शोधकार्य सुरू असताना दोरीच्या सहाय्याने विहिरीत उतरलेला पवन पिंपळे हा तरुणही गाळात फसला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. शोधकार्याचा आढावा घेऊन त्यांनी महसूल व पोलीस प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या. अपघातात जखमी झालेल्या शिक्षक अमोल मुरकुटे यांचीही आ. डॉ शिंगणे यांनी रुग्णालयात जाऊन भेट  घेतली. सिद्धी मुरकुटे तिची आई स्वाती मुरकुटे आणि पवन पिंपळे यांच्या मृत्यूचे वृत्त अत्यंत दुःखद आहे.

मुरकुटे आणि पिंपळे कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी  आहोत. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना या शब्दात आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान शेवटचे वृत्त रात्री पावनेआठला हाती आले तेव्हा विहिरीतून पंपाच्या सहाय्याने पाणी उपसने सुरू होते . घटनास्थळी अंधार व  खोल विहिरीत अजूनही भरपूर पाणी असल्याने शोधकार्यात अडचणी येत आहेत.