समलिंगी संबंधांतून कक्षसेवकाचा खून करणाऱ्यांना आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी!

 
5836
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) समलिंगी संबंधांतून जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे कक्षसेवक  असलेल्या श्रीराम पांडुरंग शेळके याचा खून करण्यात आल्याचे १६ एप्रिल रोजी बुलडाणा शहर पोलिसांनी उघडकीस आणले होते. बुलडाणा शहरातील ७ जणांना याप्रकरणी पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली होती. आज, १९ एप्रिल रोजी तीन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. तेव्हा पोलिसांनी अधिकच्या तपासाकरीत आणखी पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाला केली. त्यामुळे सातही आरोपींना न्यायालयाने पुन्हा एकदा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

बुलडाणा शहरातील सावित्रीबाई फुले नगरातील आनंद गवई (१९) याच्याशी श्रीराम शेळकेची ओळख झाली होती. दोघांमध्ये समलिंगी व्हिडिओ चे आदान प्रदान होत होते व चॅटिंग होत होती. २९ मार्चला श्रीराम शेळके आनंदला भेटायला बुलडाण्यात आला होता. दोघांनी शाश्वत खंदायता याच्या घरात समलिंगी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. याचे शूटिंग आदेश राठोड आणि शाश्वत खंदायता यांनी केले होते.

ते चित्रीकरण श्रीराम शेळके ला दाखवून आरोपींनी पैशांची मागणी केली होती. श्रीराम ने पैसे द्यायला नकार दिल्याने आदेश आणि शाश्वत खंदायता ने चेतन वावरे, संतोष शर्मा, दीक्षांत नवघरे, कुंदन बेंडवाल यांना बोलावून श्रीराम शेळकेला बेदम मारहाण केली होती. तो बेशुद्ध झाल्यावर त्याला मलकापूर रोडवरील  बालाजी मंदिराच्या कमानीजवळील मोकळ्या शेतात टाकून आरोपींनी पोबारा केला होता. रात्री साडेदहाला पोलिसांनी श्रीराम शेळके ला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणले होते व त्यानंतर औरंगाबाद येथे हलविले होते.

दुसऱ्या दिवशी ३० मार्च रोजी श्रीराम शेळकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर बुलडाणा शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील यांनी अंत्यत कौशल्याने तपास करीत हा गुन्हा उघडकीस आणला होता. १५ एप्रिलच्या रात्री ११ ते साडेअकरा या अर्ध्या त्यासात सर्व आरोपींना एकाच वेळी अटक करण्यात आली होती.
 पोलिसांनी आतापर्यंतच्या तपासात आरोपींनी श्रीराम शेळके खून प्रकरणात आरोपींच्या ताब्यातून १ चारचाकी, २ मोटारसायकल व आरोपींचे मोबाईल जप्त केले आहेत. आणखी महत्वपुर्ण माहिती गोळा करण्यासाठी पोलिसांनी आरोपींची दोन दिवसांची पोलीस कोठडी घेतली आहे.