शिवजयंती उत्सवातून खरा शिवविचार रुजतोय- डॉ. अशोक खरात यांचे प्रतिपादन! सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने बुलडाण्यात शिवकालीन शस्त्रांचे पूजन

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. शोन चिंचोले, माजी अध्यक्ष जयसिंगराजे देशमुख, सागर काळवाघे, सुनील सपकाळ, डॉ. विवेक चिंचोले राजेश हेलगे, गणेश निकम, सोहम घाडगे आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना डॉ. खरात म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी शस्त्रांचे महत्व ओळखून आपल्या शस्त्रागारात त्यांचा समावेश केला होता. त्यामुळेच त्यांनी अनेक युद्ध जिंकली. सैन्याला शस्त्र चालवण्याचे उत्तम प्रशिक्षण देण्याकडे त्यांचे विशेष लक्ष असायचे. सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. शोन चिंचोले म्हणाले, शिवजयंती उत्सव हा लोकोत्सव म्हणून साजरा केला जातो. त्यासाठी यावर्षीही विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. नागरिकांनी शिवजयंती उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
कोरोनाकाळानंतर यावर्षी साजरा होणारा शिवजयंती सोहळा ऐतिहासिक ठरेल, असा विश्वास माजी अध्यक्ष जयसिंगराजे देशमुख यांनी व्यक्त केला. इतर मान्यवरांनीही विचार व्यक्त केले.
शिवकालीन शस्त्रांचे पूजन
वसंतप्रभा नर्सिंग कॉलेजमध्ये शिवकालीन शस्त्रांचे पूजन करण्यात आले. तलवार, दांडपट्टा, अग्निगोल, भाला, ढाल, बर्ची, कट्यार, बिचवा, खांडा तलवार, मराठा तलवार, वाघ नखे आदी शस्त्रांचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी शस्त्र चालवण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. अतिशय चपळाईने हे विद्यार्थी शस्त्र हाताळत होते.
ढोलपथकाने वेधले लक्ष
शिवजयंती उत्सवासाठी वसंतप्रभा नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे ढोल पथक कसून सराव करीत आहे. या पथकाची तयारी पुणे, मुंबईच्या ढोल पथकाच्या तुलनेत कुठेच कमी नाही. अतिशय सुंदर पद्धतीने हे ढोलपथक सादरीकरण करीत आहे. सोमवारी या ढोल पथकाने सादर केलेल्या प्रात्यक्षिकाने उपस्थितांचे लक्ष वेधले.प्राचार्य सुनील कुमार चव्हाण
भूषण पांडे . अतुल पाटील ,सागर अरमाळा , परमेश्वर पल्हाड, अनिल अंभोरे, विशाल काळे, नयना किटे मॅडम, पुनम बोरकर, कीर्ती इंगळे, गौरी चव्हाण, रश्मी पांडे, रूपाली व्यवहारे,
सायली दरमोळे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्य केले.