तिरंगा स्पेशल! स्वातंत्र्याला 75 वर्षे; सायकल रॅली 75 किलोमीटरची !! ' घरोघरी'ची ग्रामीण भागात जागृती: कर्मचारी व सायकल ग्रुप चा स्तुत्य उपक्रम

 
ster
बुलडाणा( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा,):  स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत काही कर्मचारी आणि बुलडाणा सायकल ग्रुप तर्फे 75 किलोमीटर अंतराची सायकल रॅली काढून घर घर तिरंगा उपक्रमाची जन जागृती काढण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयातून सुरू झालेल्या या रॅलीला अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, आरडीसी दिनेश गीते, तहसीलदार रूपेश खंडारे यांनी हिरवी झेंडी दाखविली.  यावेळी भारत माता की जय, घर घर तिरंगा अश्या घोषणा देण्यात आल्या.  यानंतर ही रॅली सागवन, कोलवड, तांदुळवाडी, हतेडी, चिखला, दुधा, ढालसावंगी, धाड, धामणगाव, मासरूळ, तरालखेड, गुम्मी, मढ, गिरडा, पळसखेड नागो, देऊळघाट मार्गे बुलडाण्यात आल्यावर रॅलीचा समारोप झाला. हे अंतर मोजण्यात आले तेंव्हा ते ठीक 75.75 किलोमीटर इतके भरले. 

हे विर झाले सहभागी...

या रॅलीत  संजय बनगाळे, संजय मयुरे, गाडे, संजय खुळे, महेंद्र जाधव, राजेश जाधव, सरदारसिंह ठाकूर, संदीप मुंडे, रितेश नायडू, निलेश शिंदे, हे कर्मचारी, सायकल ग्रुप व ज्ञानगंगा फॉरेस्टचे सदस्य सहभागी झालेत. विशेष म्हणजे खुळे यांनी साध्या सायकलने सहभाग घेतला.