ही बातमी आजी- माजी सौनिक, जवानांच्या कुटुंबियासाठीच! कोणतेही शासकीय काम अडलं असेल तर फक्त 'या' सभेला हजर रहा..!!

 
yjygjy
 बुलडाणा( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): निस्वार्थ भावनेने देशाचे रक्षण करणाऱ्या प्रसंगी प्राणाचे बलिदान करणाऱ्या भारतीय जवानांची वा त्यांच्या कुटुंबियाची प्रलंबित शासकीय कामे प्राधान्याने होणे आवश्यक ठरते. मात्र अनेकदा याच्या विपरीत अनुभव येतो. हे टाळण्यासाठी शासनातर्फे अमृत जवान  अभियान राबविण्यात येत आहे.
 

या अंतर्गत  बुलडाणा तहसील कार्यालयात 18 जुलै रोजी दुपारी 1 वाजता विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. तालुक्यातील ज्या आजी माजी सैनिक, विधवा पत्नी, वीर पत्नी वा त्यांच्या कुटुंबियांची शासकीय कामे प्रलंबित असतील त्यांनी या सभेला उपस्थित राहावे असे आवाहन तहसीलदार रूपेश खंडारे यांनी केले आहे.

महसूल विभागाकडे प्रलंबित फेरफार, बीनशेती व बांधकाम परवानगी, भूसंपदान व पुनर्वसन, दाखले, रेशनकार्ड, पोलिसांकडे असलेल्या तक्रारी, जमीन- पाणी यावरील फोजदारी वाद, याचा यावेळी निपटारा करण्यात येईल. तसेच  विविध विभागाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी यावेळी प्रयत्न करण्यात येणार आहे.  यामुळे ही मेळावा वजा सभा उपयुक्त ठरणार असून याचा लाभ घेण्याचे आवाहन तहसीलदार रूपेश खंडारे यांनी केले आहे.