दृरदृष्टी म्हणतात ती याला! रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर आ. श्वेताताईंनी घेतली महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक; म्हणाल्या,विजेचे योग्य नियोजन करून कृषी पंपांना मुबलक वीजपुरवठा करा..!

 
jyfyt
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखलीच्या आमदार श्र्वेताताई महाले पाटील शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी सदैव कार्यतत्पर असतात. शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना मुबलक वीजपुरवठा मिळावा, वीजबिले माफ करावी या मागण्यासाठी गेल्या वर्षी त्यांनी केलेले आंदोलन राज्यभर चर्चेचा विषय ठरले होते. दरम्यान यंदाही रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर हंगामाच्या सुरुवातीलाच आमदार श्र्वेताताईंनी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीत विजेचे योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना वीज पुरवठा कमी पडू देऊ नका अशी सक्त ताकीद आमदार श्वेताताईंनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली.

यंदा खरीपाचा हंगाम अतिवृष्टीमुळे हातातून गेला मात्र नदी नाले तुडुंब भरलेले असल्याने शेतकऱ्यांना रब्बी हंगामातून उत्पन्नाची अपेक्षा आहे. मात्र पाणी असूनही जर वीजपुरवठा अपुरा पडला तर शेतकऱ्यांचे रब्बीचेही नुकसान होईल. त्यामुळे गेल्यावर्षीसारखे ढिसाळ नियोजन करू नका. यंदा ऊर्जा विभाग उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आहे, कोणत्याही अडचणी सोडविण्यासाठी ते सक्षम आहेत.

त्यामुळे तुमच्या अडचणी तात्काळ कळवा मात्र शेतकऱ्यांना त्रास होता कामा नये असे आमदार श्र्वेताताई म्हणाल्या. कृषी पंपांना किमान आठ तास सुरळीत वीज पुरवठा झालाच पाहिजे असेही त्या म्हणाल्या. या बैठकीला भाजपा बुलडाणा तालुकाध्यक्ष सुनील देशमुख, गटविकास अधिकारी सरिता पवार, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता इंगळे, नायब तहसिलदार अमरसिंह पवार, वीज वितरण कंपनीचे अधिकारी यांच्यासह तालुक्यातील गावांचे सरपंच , ग्रामसेवक उपस्थित होते.