याला म्हणतात मकर संक्रांती! कुडकुडत्या थंडीत मिळाली मायेची उब!मनोरुग्णांची संक्रांत झाली गोड! दिव्य सेवा प्रकल्पावर अशी साजरी झाली संक्रांत...

मकर संक्रांतीला तिळगुळ देण्याची आणि वाण वाटण्याची प्रथा आहे. मकर संक्रांतीला केलेले दान शंभर वेळा अधिक होऊन स्वतःला प्राप्त होते, अशी समाजमान्यता आहे.या दान-धर्माच्या पुण्यप्रसंगी ही संधी न दवडता मकर संक्रांतीला आपल्या क्षमतेनुसार काहीतरी दान करण्याचा प्रघात आहे. आज मकर संक्रांती आहे.
मात्र गेल्या ५ ते ६ दिवसापासून जिल्ह्यात थंडीची लाट उसळली. चोर पावलांनी येणारी थंडी उजागरीने आली. सर्वसामान्य थंडीपासून बचाव देखील करतात.महागडे उबदार कपडे घालतात.परंतु निराधार मनोरुग्ण यांच्या नशिबी कडाक्याच्या थंडीत कुडकुडणे येते.याची जाणीव ठेवून वरवंड येथील दिव्य सेवा प्रकल्पातील मनोरुग्णांसाठी आशा शिरसाट, लक्ष्मीताई शेळके, शितल सोनुने, विजया पवार,वर्षा सोनवणे, जयश्रीताई देशमुख,अनिताताई कोळसे,भाविका धनवाणी,हेमा धनवाणी, विजया किन्होळकर, सुषमा राऊत, अर्चना टाले आदी
दानशूर महिलांनी उबदार कपडे वाटप केले. तिळगुळ देऊन मनोरुग्णांचे तोंड गोड करण्यात आले.