थर्टी फर्स्ट स्पेशल! ढोसा..! पिणाऱ्यांवर सरकार मेहरबान;उद्या सकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार मद्यविक्री आणि परमिट रूम; देशी दारू पिण्यासाठी ५ रुपयांत मिळणार.....

 
daru
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजे थर्टी फर्स्टला जो तो पार्टीचे नियोजन करण्यात व्यस्त आहे. हिंदुत्ववादी संघटनाकडून आपले नविन वर्ष गुढीपाडवा असा ट्रेण्ड सोशल मीडियावर सुरू करण्यात आला असला तरी मद्यप्रेमी आणि मटणाचा बेत आखण्याऱ्यांवर त्याचा परिणाम होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान दारू विक्रीतून सरकारला मोठा महसूल मिळत असल्याने सरकारच दारू पिणाऱ्याना प्रोत्साहन देत आहे. म्हणूनच की काय, जिल्ह्यात मद्यविक्री व परमिट रूम १ जानेवारीच्या पहाटे ५ पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 २०२२ या वर्षाचा आज, ३१ डिसेंबरला शेवटचा दिवस आहे. यंदाचा थर्टी फर्स्ट शनिवारी आल्याने काहींचा "खाण्याचा" बेत हुकला असला तरी अनेकांचा पिण्यावर जोर असणार आहे. महसूल मिळवण्यासाठी सरकार सुद्धा पिण्याऱ्यांवर मेहरबान झाले आहे.त्यामुळेच जिल्ह्यातील परमिट रूम व मद्यविक्री उद्या पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू असणार आहे.

अर्थात परमिट रूम, रेस्टॉरंट, क्लब इत्यादी ठिकाणी दारू पिण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी परवानगीची आवश्यकता असते.  राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने १ दिवसासाठी देण्यात येणारा हा परवाना मिळवण्यासाठी ५ रुपये लागतात. २१ वर्ष पूर्ण असलेल्या व्यक्तीलाच असा परवाना मिळतो. दरम्यान जिल्ह्यात आज,३१ डिसेंबर साठी २९ हजार ८०० जणांनी हा परवाना मिळवला असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बुलडाणा कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले. ज्यांच्याकडे  परवाना नाही अशा मद्य प्राशन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार आहे.