बुलडाण्यातल्या चोरट्यांना लागला बॉडी बिल्डिंगचा नांद! वाचा प्रकरण नेमके आहे तरी काय..

 
jim
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): व्यायाम शाळा कसरतीसाठी असते. शरीर घडवून पोलीस किंवा सैन्य दलात दाखल होण्याचे स्वप्न तरुण पाहत असतात. परंतु या व्यायाम शाळेतील साहित्य देखील चोरीस जात आहे. बुलडाणा शहरातील मिलिंद नगर येथील एका व्यायामशाळेतून डंबेल्स सह २६ हजाराचे साहित्य चोरी गेल्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चोरटा आशुतोष उर्फ बंड्या संजय पडघान राहणार मिलिंद नगर याला काल रात्री अटक करण्यात आली. त्याला डंबेल्स ची नितांत गरज होती.

 शहरातील मिलिंद नगर भागात किशोर परसराम बेंडवाल यांनी वर्ष २००७ पासून युवा जागृती या नावाने व्यायाम शाळा कार्यान्वित केली. या व्यायाम शाळेत अनेक तरुण कसरत करतात. परंतु १ जानेवारी रोजी सकाळी बेंडवाल हे व्यायाम शाळेत साफसफाई करण्यास गेले असता, त्यांना व्यायाम शाळेतील साहित्य कमी असल्याचे जाणवले.

दरम्यान त्यांनी व व्यायाम शाळेतील इतर मुलांनी सावधपणे साहित्यांवर वॉच ठेवला.२ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान फिर्यादी किशोर बेंडवाल हे बुलडाणा कारागृहाच्या पाठीमागे फिरण्यासाठी गेले असता, मिलिंद नगर येथील आशितोष उर्फ बंड्या संजय पडघान हा २ डंबेल्स घेऊन जाताना दिसला. त्यांनी आरोपीला पाठलाग करून पकडले. दरम्यान आशितोष उर्फ बंड्या संजय पडघान याने २६ हजार रुपयांची साहित्य चोरी केल्याचे उघड झाले आहे.