चोर तर चोर वरून शिरजोर!आधी पानटपरीतील रक्कम चोरली,नंतर लावली आग!फ्रिज,टिव्ही,तसेच सर्व साहित्य जळून खाक; बुलडाणा तालुक्यातील चांडोळची घटना

 
sertyu
चांडोळ( प्रमोद गायकवाड:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बसस्टँड परिसरात असलेल्या जय भवानी पान सेंटरचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम चोरून त्यास आग लावल्याची घटना गुरुवारच्या मध्यरात्री तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास घडल्याची तोंडी फिर्याद भागवत सोनुने यांनी धाड पोलिसात दिली आहे.

प्राप्त माहितीनुसार नेहमी प्रमाणे दुकान बंद करून चांडोळ येथील भागवत सोनुने रात्री दहा वाजेच्या सुमारास  घरी गेले.तसेच मध्यरात्री शौचास आलेल्या एकाने यांना त्या पानटपरीत संशयास्पद म्हणजे तोड फोड करत असल्याचा आवाज आल्याने त्यानी लगेच भागवत सोनुने यांच्या घरी जाऊन माहिती दिली. तेव्हा टपरी मालकाने परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन गेले असता पानटपरीचा दरवाजा उघडलेला होता व चोर तेथून पसार झाले होते.तर पानटपरीतून आगीचे लोण बाहेर पडत

होते. एका घरातून नळी लांबवुन ती विझविण्यात आली परंतु पानटपरीतील सर्व साहित्य जळून खाक झाले होते.त् यात टिव्ही,फ्रिज व सर्व साहित्य जळाले होते.तर ज्या डब्यात पैसे होते तो डबा तसेच दहा ते बारा हजाराची चिल्लर सुद्धा गायब होती.त्यामुळे एकूण तीस ते चाळीस हजाराचे नुकसान झाले आहे.

घटनास्थळी पोलीस पाटील पंकज देशमुख, तंटामुक्त अध्यक्ष सुरेश धनावत,सरपंच सुनिल महेर,उपसरपंच,ग्राम पं.सदस्य पत्रकार बांधव,तसेच मित्रमंडळींनी व ग्रामस्थांनी झालेला प्रकार पाहून चोरट्यांचा रोष व्यक्त केला.तसेच धाड पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्याचा पंचनामा केला असून पुढील तपास ठाणेदार अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धाड पोलीस करीत आहे.